( रत्नागिरी / प्रतिनिधी )
देशभर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. यामध्ये ग्रामीण भागातदेखील मोठया आनंदात विविध उपक्रमांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उपक्रमाची सांगता झाली. तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. 1 मध्ये माजी सैनिक शरद जोशी, रामचंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुरव, विद्या जाधव, शिवानी धुळप, महादेव नरवणे, मोहन जाधव, ज्येष्ठ ग्रामस्थ प्रमोद नार्वेकर, मारुती पाडळकर, लिंगायत, व्यवस्थापन अध्यक्ष शशिकांत जाधव तसेच रामदास लांजेकर, विनायक गुरव, प्रसाद पावसकर, सुबोध शिंदे, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या लक्षवेधी उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत नाखरेच्या वतीने दिलेल्या सुशोभन निधीतून शाळेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या तसेच वीर जवानाच्या स्मृती जागवणाऱ्या फलकस्तंभाचे अनावरण उपस्थिताच्या हस्ते पंचाहत्तर दीप लावून करण्यात आले. याचवेळी इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या चांद्रयान 3 च्या प्रतिकृतीबद्दल विदयार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मुलांच्या सृजनशीलतेचे उपस्थितानी कौतुक करीत शाबासकी दिली. दरम्यान माझी माती, माझा देश उपक्रम अंतर्गत शाळा स्तरावर घेतलेल्या विविध स्पर्धात यशस्वी झालेल्या विजेत्यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने प्रशस्तिपत्र आणि पुस्तके देऊन गौरव केला.
स्वातंत्र्यदिन साजरा करताना विदयार्थीनी स्वरा बेंद्रे, नम्रता गुरव, अश्विनी हरमले, जान्हवी जाधव, सानवी नरवणे, अनन्या धुळप यांनी भूमिका अभिनयातून मनोगते व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभीच पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने उपक्रम आयोजित केले होते त्यास निर्मल ग्रामपंचायत नाखरे सरपंच शुभदा नार्वेकर, उपसरपंच विजय चव्हाण, आजी माजी विद्यार्थी, महिलावर्ग, समस्त नाखरे परिवार तसेच शिक्षक राजेंद्र भिंगार्डे, सुमेधा जोशी, अंगणवाडीताई मंगला चव्हाण, स्वयंपाकी पूजा धुळप, मदतनीस मनिषा धुळप यांची साथ लाभल्यामुळेच शाळेला भरघोस यश मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक शशिकांत घाणेकर यांनी दिली.
पालक ग्रामस्थ यांची भरगच्च उपस्थिती, वीरांचे स्मरण करणारा फलक अनावरण, 75 दीप प्रज्वलन, पंचप्रण शपथ, माती संकलन कलश, माजी सैनिक सन्मान, 75 वर्षे पूर्ण नागरिक सन्मान, सुंदर मनोवेधक रांगोळी, विदयार्थ्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेली चांद्रयान प्रतिकृती,मुलींची वेशभूषा आणि दमदार भाषणे, विविध स्पर्धा बक्षीस गुणगौरव, ध्वजारोहण मुलांचे उत्तम सादरीकरण, सन 1994/1995 च्या बॅच ने केलेले जिलेबी वाटप, लाडू आणि अन्य खाऊची रेलचेल, लेझीम नृत्याने शेवट ही अमृतमहोत्सवी वर्ष सांगता समारोहाची वैशिष्ट्ये ठरली.
हर घर तिरंगा मेरी मिट्टी – मेरा देश उपक्रम अंतर्गत घेतलेल्या स्पर्धाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे अनुक्रमे (प्रथम, द्वितीय, तृतीय ):
गट 1 ते 4
चित्रकला स्पर्धा – ईशा नितेश शिर्के, समर्थ मोहन भरणकर, देवांगी सुरेंद्र कुळये
निबंध स्पर्धा – तीर्था धर्मेंद्र कुळये, दुर्वा सुधीर धुळप, संस्कार धर्मेंद्र कुळये
वक्तृत्व स्पर्धा – दुर्वा सुधीर धुळप, तीर्था धर्मेंद्र कुळये, स्वरा स्वप्नील गमरे
टाकाऊतून टिकाऊ – तीर्था धर्मेंद्र कुळये, दुर्वा सुधीर धुळप, सिहान विशाल जाधव
मोठा गट इ. 5 ते 7
चित्रकला स्पर्धा – कथा संकेत जाधव, योगिनी सुबोध शिंदे, संस्कृती प्रसाद पावसकर
निबंध स्पर्धा – सरोज मनिष गुरव, सार्थक जगन्नाथ पाष्टे, सार्थक वैभव गुरव
वक्तृत्व स्पर्धा – अनन्या सुधीर धुळप, सानवी पांडुरंग नरवणे, स्वराज सुहास घवाळी
टाकाऊतून टिकाऊ – सोहम संतोष गुरव, सानवी पांडुरंग नरवणे, संस्कार गणेश मुंगणेकर
अमृतमहोत्सव संस्मरणीय करणाऱ्या नाखरे शाळेचे तसेच पालक, ग्रामस्थ आणि निर्मल ग्रामपंचायत नाखरेचे केंद्रप्रमुख प्रकाश काजवे, विस्तार अधिकारी सायली सावंत, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, डायट प्राचार्या अनुपमा तावशिकर, तर पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी विशेष अभिनंदन केले आहे.