(वास्तू)
आपले घर हे केवळ चार भिंतींची इमारत नसून दिवसभराच्या कामाच्या धावपळीने थकल्या भागल्या जीवाला विसावा देणारी अशी “वास्तू” असते. घरामधील वातावरण प्रसन्न असावे, सकारात्मक ऊर्जेचा संचार असावा, कोणत्याही प्रकारचे अस्वास्थ्य, ताणतणाव, आरोग्याशी संबंधित तक्रारी असू नयेत, आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी वास्तूशास्त्रानुसार घराची रचना असणे महत्त्वाचे आहे. पण अनेकदा घाई-गडबडीमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊन घरामध्ये सतत लहान मोठ्या अडचणी, आर्थिक नुकसान, तब्येतीच्या तक्रारी उद्भवू लागतात. म्हणूनच नवीन वर्षात प्रत्येकाने आपले घर सुंदर, स्वच्छ आणि वास्तूनुसार बनवण्यासाठी वचनबद्ध झाले पाहिजे. वास्तू ही नीटनेटकीच असली पाहिजे. जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, परिणामी प्रत्येकाचे आरोग्यही चांगले राहील.
नुकतेच नवीन वर्ष २०२३ सुरू झाले आहे. नवीन वर्ष खूप आनंद घेऊन येवो हीच आपल्या सर्वांची इच्छा असते. नवीन वर्ष आपल्या जीवनात बदल घडवून आणेल असा प्रत्येकाचा विश्वास असतो, यासाठी अनेक लोक स्वतःला सुधारण्यासाठी विविध संकल्प घेतात. ज्याच्याशी आपली प्रगती, सुख आणि समृद्धी जोडलेली असेल असा संकल्प घेणे खरच गरजेचे आहे. नवीन वर्षात आपण आपले घर सुंदर, स्वच्छ आणि वास्तूनुसार बनवण्याची प्रयत्न केला पाहिजे.
१. घराच्या भिंतींवर पापुद्रे आलेले पेंट किंवा भेगा, जाळे, तुटलेल्या खिडक्या-दरवाजे, ओलसरपणा आणि गळणारे नळ, टाकाऊ वस्तू आणि कचऱ्याचे ढीग कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक आजारी बनवतात. त्यामुळे या आठ दिवसात याबाबतीत घर स्वच्छ करण्याचा संकल्प घ्या.
२. घरातील सदस्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि घराच्या आर्थिक प्रगतीसाठी पाण्याशी संबंधित काम कधीही अग्नीच्या दिशेने करू नये. बोरिंग, नळ, हातपंप आणि पाण्याची टाकी आग्नेय दिशेला ठेवणे शुभ मानले जात नाही. आग्नेय दिशेला असलेली भूमिगत पाण्याची टाकी धनाचा सकारात्मक प्रवाह रोखते, तसेच महिलांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम करते. जर असे असेल तर ही दिशा अवश्य बदला.
३. मुलांचे शिक्षण, बुद्धिमत्ता आणि विकास वैभवशाली ठेवायचा असेल तर यासाठी पूर्व दिशा योग्य ठेवण्याची प्रतिज्ञा अवश्य घ्या. पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशा ही ध्यान आणि शांतीची दिशा मानली जाते आणि या दिशेने सकारात्मक शक्तींचा प्रभाव सर्वाधिक असतो. त्यामुळे अभ्यासाची खोली या दिशांना असावी आणि अभ्यास करताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे हे लक्षात ठेवा. तसेच रूममध्ये या दिशांना अस्वच्छ आणि जड वस्तू ठेऊन नका.
४. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर नैऋत्य म्हणजेच नैऋत्य कोन दुरुस्त करण्याची गरज आहे. हे शनि आणि पृथ्वी तत्वाशी संबंधित स्थान आहे, म्हणून या ठिकाणी कपाट, सोफा किंवा इतर कोणतेही कठीण टेबल इत्यादी जड वस्तू ठेवून ही दिशा सुधारण्याचा प्रयत्न करा.
५. मनात अस्वस्थता असेल किंवा लोकांशी संवाद नीट होत नसेल तर उत्तर-पश्चिम दिशा योग्य ठेवणे आवश्यक आहे. चंद्र हा या दिशेचा कारक आहे. या दिशेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काहीही स्थिर राहत नाही. ही दिशा दुरुस्त करण्यासाठी येथे अर्धचंद्राचे चित्र लावा आणि येथे हलका सिल्व्हर टोन रंग लावणे शुभ असते.
६. तुमच्या कामात अडथळे येत असतील, यश येत नसेल आणि प्रगती होत नसेल तर घरातून काटेरी, दुधाळ आणि बोन्साय झाडे काढून टाका. या ऐवजी तुमच्या घरात छोटी हिरवी रोपे लावा, यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि पैसा मिळेल.
७. आपले आरोग्य वारंवार बिघडत असेल किंवा पैशाची समस्या असेल तर उत्तर दिशा निश्चित करा. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, त्यामुळे तिजोरी अशा प्रकारे ठेवावी की, अलमिराचे दार उत्तरेकडे उघडेल, त्यामुळे धनवृद्धी होते. या दिशेचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी लक्ष्मी किंवा कुबेर यांचे चित्र किंवा हिरवळीचे चित्र सोनेरी चौकटीत लावावे.