(मुंबई)
नवीन वर्षात 1000 रुपयांची नवी नोट येईल आणि 2000 च्या नोटांवर बंदी येईल, असा मेसेज सर्व सोशल मीडियावर येत आहे. या मेसेजमध्ये देशात लवकरच दोन हजाराच्या नोटा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच दोन हजाराच्या नोटाच्या जागी पुन्हा भारतात एक हजाराची नोट सुरु होणार असल्याची माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. तर यामागचे सत्य काय आहे हे जाणून घेऊया.
2018-19 नंतर 2000 रुपयाच्या नोटा छपाईसाठी कोणतेही नवीन पत्र देण्यात आले नसल्याची माहिती केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती. असे असतानाही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये 1 जानेवारी 2023 पासून 1000 रुपयांच्या नोटा परत येत असल्याचा दावा केला जात आहे. यासह या दाव्यात असेही म्हटले आहे की, 2000 रुपयांच्या नोटाही बँकेत परत येणार आहेत. त्याचबरोबर दोन हजाराच्या नोटा बँकांमध्ये परत येणार आहेत. यादरम्यान सर्वसामान्यांना नोटा बदलून घेण्यासाठी फक्त 50 हजार रुपये जमा करण्याची परवानगी असेल. त्यासाठी केवळ दहा दिवसांचा अवधी दिला जाणार आहे.
व्हिडिओमध्ये केला जाणारा दावा खोटा
2000 रुपयांच्या नोटा बंद करून 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीच्या काळात 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी आरबीआयने 2000 रुपयांची नवी नोट जारी केली होती. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये केला जाणारा खोटा असल्याचे PIB ने म्हटले आहे.
सोशल मीडिया पर वायरल वीडियों में दावा किया जा रहा कि 1 जनवरी से 1 हजार का नया नोट आने वाले हैं और 2 हजार के नोट बैंकों में वापस लौट जाएंगे। #PIBFactCheck
▶️ये दावा फर्जी है।
▶️कृपया ऐसे भ्रामक मैसेज फॉरवर्ड ना करें। pic.twitter.com/rBdY2ZpmM4
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 16, 2022
केंद्र सरकारच्या अधिकृत फॅक्ट चेकर ‘पीआयबी फॅक्ट चेक’ ने लोकांना असे खोटे आणि दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या ट्विटमध्ये हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. कृपया असे दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड करू नका, हे ट्विट पीआयबीने १६ डिसेंबर रोजी केले आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही, असे या मेसेजमध्ये पुन्हा सांगण्यात आले.