(रत्नागिरी)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, अश्या विविध क्षेत्रात काम करत असलेले व्यक्तींना आणि संस्थान दैनिक नवराष्ट्रच्या विविध पुरस्काराने राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विविध ३५ पुरस्कार देऊन समाजातील विविध घटकांमधील सामाजिक कार्यकर्ते यांचा शोध घेऊन हे पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दैनिक नवराष्ट्रचे आभार मानत कौतूक केले.
पुरस्कारासाठी पात्र असलेले लोक रत्नागिरीमध्ये आहेत याचे रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून मला अभिमान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.रत्नागिरीच्या जढण घडणीत नवराष्ट्रचे महत्व पूर्ण योगदान असून वृत्तपत्रातील अनन्य साधारण महत्व टिकवण्याचे काम नवराष्ट्रने करावे असे अहवान ही उदय सामंत यांनी केले.
या कार्यक्रमाला रत्नागिरीचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, नवराष्ट्रचे CT एडिटर विशाल राजे, शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तूजा, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश वराडकर आदी उपस्थित होते.