(दापोली)
दापोली आगार (रत्नागिरी विभाग) व कोकण एसटी प्रेमी यांच्या सौजन्याने नवरात्री उत्सवानिमित्त पाजपंढरी(राम मंदीर) दापोली ते एकविरा आई मंदिर अशी बस सेवा ३ व ४ ऑक्टोबर या दोन दिवशी सोडण्यात येणार आहे. सदर बस पाजपांढरी(राममंदिर) येथून सकाळी ०७.०० वाजता सुटून आसुदपुल, दापोली येथे ०७.३० वाजता येऊन तेथून पुढे खेड, पोलादपूर, महाड, माणगाव, वाकण फाटा, पाली, खोपोली मार्गे एकविरा आई मंदिर अशी जाईल व तेथून परतीच्या प्रवासासाठी दुपारी १६.३० वाजता सुटणार आहे.
अधिक माहितीसाठी वरील माहिती पत्रकावर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा. कोकण एसटी प्रेमी व दापोली आगार यांच्यातर्फे प्रवाश्यांनी सदर बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.