(नाणीज / वार्ताहर)
श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिका सेवेच्या मुंबई-गोवा महामार्गावरील आठ रुग्णविका सेवा चालकांचा सत्कार नुकताच झाला. रस्तावाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव,सुदेश करंदीकर, ऋषिकेश कोराने,मंगेश गुरव, अफरिन मुलाणी, आरती देसाई व कर्मचारी मंगेश नाईक, गणेश नाचणकर, किरण दावलकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मंत्री उदय सामंत यांनी संस्थानच्या रुग्णवाहिका सेवेचे कौतुक केले.
राज्याच्या हद्दीतील महामार्गावर संस्थानच्या सध्या ५२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. महामार्गावर झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे जखमींवर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत होते. त्यातील मुंबई-गोवा महामार्गावर आठ ठिकाणी रुग्णवाहिका आहेत. या महामार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. अपघाताची वार्ता कळताच चालक जखमींना लगेच नजीकच्या रुग्णालयात पोहोचवण्यासाठी धडपडत असतात. या त्यांच्या चांगल्या सेवेबद्दल आठ चालकांचा सत्कार करण्यात आला. १३ वर्षांपूर्वी या महामार्गावर ही सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर टप्याटप्याने राज्यातील अन्य महामार्गावर ही सेवा सुरू झाली. त्यातून रुग्णवाहिकांनी संख्या आज ५२ पर्यंत पोहोचली आहे.
सत्कार झालेले चालक व त्यांचे थांबण्याचे ठिकाण असे-
१) श्री सुरज सुरेश हंबीर -खेड भरणा नाका. २) श्री सत्यम सुधाकर पवार -चिपळूण ३) श्री संदेश मनोहर नागवेकर -संगमेश्वर ४)श्री धनेश शिवाजी केतकर -हातखांबा ५) श्री अमोल धोंडू तेली -नांदगाव तिठा ६ ) श्री लक्ष्मण सोनू राऊळ -सावंतवाडी ७) श्री चेतन तुकाराम शिंदे -चांढवे पोलाद
८) मुकुंद राजाराम मोरे – कशेडी घाट.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे आजपर्यंत २१ हजारांवर अपघातातील जखमींचे प्राण वाचले आहेत. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. जखमीला व त्यांच्या नातेवाईकांना पैसे खर्च करावे लागत नाहीत. या रुग्णवाहिका सेवेचे पालकमंत्र्यांनी कौतुक केल.