( मुंबई )
गुरुवारी विधिमंडळात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षभरात पावसामुळे व अन्य नैसर्गिक घटनांमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी काहीतरी भरीव तरतूद केली जाईल अशी अपेक्षा होती. या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात ‘नमो सरकारी शेतकरी योजना’ जाहीर करण्यात आली आहे.
‘नमो सरकारी शेतकरी योजना’अंतर्गत आता शेतक-यांच्या खात्यावर एका वर्षात बारा हजार रुपये जमा होणार आहेत. पूर्वी शेतक-यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळायचे. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून, शेतक-यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी ६ हजारांच्या निधीत आणखी ६ हजारांची भर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा फायदा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.