( निवोशी/गुहागर- उदय दणदणे)
नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र-भारत) ही नमन लोककला व कलाकारांच्या न्याय हक्कासाठी घटनात्मक नोंदणी करून संस्थेची स्थापना करण्यात आली असून संपूर्ण कोकण सह महाराष्ट्रात संस्थेचा प्रसार, प्रचार, सुरू असून प्रत्येक तालुका पातळीवर शाखा स्थापित करण्याचे कार्य सुरू आहे. नुकताच दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रविवार रोजी राजापूर येथे “भू” ग्रामपंचायत सभागृहात नमन लोककला संस्था ( भारत) संलग्न -राजापूर शाखेचे शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र मटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्थापन सोहळा सभेची सुरुवात दिपप्रज्वलन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले! त्यानंतर जेष्ठ नमन कलावंत स्वागताध्यक्ष श्री धनाजी सूर्या तांबे यांनी उपस्थित मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून नमनकर मंडळींचे कलाकार यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
तद्नंतर नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र मटकर यांनी नमन लोककला संस्था ( भारत) संलग्न -राजापूर तालुका शाखेचे स्थापन सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाले असे अधिकृत घोषणा करून आजपासून नमन लोककला संस्था ( भारत) संलग्न- तालुका शाखा – राजापूर आपल्या न्याय हक्कासाठी व कलाकारांच्या उन्नती करीता रुजू होत आहे. आजवर जे प्रेम आम्हाला दिलात तसंच प्रेम नमन लोककला संस्थाप्रति असावं अशी अपेक्षा व्यक्त केली. इथे पदावर आम्ही असू नसू परंतु संस्था ही कायमस्वरूपी राहिली पाहिजे वाढली पाहिजे असे गौरवोद्गारपर उपस्थित कलावंतांना आश्वाशीत केले.
त्याचप्रमाणे मान्यवरांनी आपल्या भाषणातुन सुसंवाद सादत नमन लोककलाप्रति प्रबोधन, मोलाचे मार्गदर्शन करत संस्थेच्या पुढील वाटचलीकरीता शुभेच्छा दिल्या!
सदर शुभारंभ प्रसंगी सभेत राजापूर शाखेची ग्रामीण/ मुंबई कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी- श्री धनाजी तांबे, सचिवपदी- अशोक डोंगरकर, खजिनदार- विजय मांडवकर तर मुबंई कार्यकारणीमध्ये संदेश कुंभार, सुरेश मांडवकर, गुणाजी निनावे, महेश भोवड, पिंकेश बापर्डेकर, यतीश रांबाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
नमन लोककला व लोककलावंताच्या न्याय हक्कासाठी उभी राहिलेली चळवळ भविष्यात नक्कीच परिवर्तन घडवून लोककलावंत न्याय प्राप्त करून देईल असा विश्वास कलाकारांमध्ये दृढ होत आहे
सदर स्थापन सोहळ्याला प्रमुख मान्यवर “नमन लोककला संस्था ( भारत) चे अध्यक्ष रविंद्र मटकर, महासचिव/ पत्रकार- श्री शाहिद भाई खेरटकर, सचिव – श्री सुधाकर मास्कर उपाध्यक्ष- श्री रमाकांत जावळे, श्री उदय दणदणे -(का. सदस्य) श्री मोहन पाडावे, श्री झराजी वीर ( रत्नागिरी) तसेच श्री सदानंद चव्हाण ( माजी पंचायत समिती सभापती) श्री शिवाजी तेरवणकर ( कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अध्यक्ष) श्री संजय (शेट )सरफरे ( जेष्ठ उद्योजक) श्री वसंत तांबे ( सरपंच-भू) दिपक कोतापर ( पोलीस पाटील) उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रसार, प्रचार नियोजन, विजय मांडवकर ( पेडखले) तुकाराम राऊत ( खिणगणी ) धनाजी तांबे (भू) सीताराम निनावे (पेडखले) अशोक डोंगरकर ( खिणगणी) यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविका- श्री अशोक डोंगरकर यांनी मांडली तर सूत्रसंचालन – श्री माधव क्षीरसागर यांनी केले. नवनिर्वाचित अध्यक्ष श्री धनाजी तांबे यांनी उपस्थितांचे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.