(खेड /इक्बाल जमादार)
खेड शहरातील नागरिकांना मोठी समस्या समोर असलेली जगबुडी व नारंगी नदी मधील गाळ उपसण्याकरिता खेड व्यापारी संघटनेकडून दापोली विधानसभाचे आमदार श्री योगेशदादा कदम यांना निवेदन देण्यात आले.आमदार योगेशदादा यांनी याविषयी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून नियोजन करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी व्यापारी संघटनेकडून श्री अतुल शेठ, श्री अरविंदभाई तलाठी, श्री शैलेशभाई सुरा, श्री मिलिंद तलाठी, अध्यक्ष आणि श्री प्रमोदभाई बुटाला, श्री गणेश भोसले, श्री ऋषिकेश कानडे, श्री सुमित गुडेकर, श्री संकेत बुटाला, श्री सचिन करवा, श्री संदीप नाईकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.