1. ज्या घरांमध्ये सूर्यास्तानंतर झाडून काढले जाते, अशा घरामध्ये लक्ष्मी राहणे पसंत करत नाही. अशा घरामध्ये लक्ष्मीची बही अलक्ष्मी प्रवेश करते.
2. जर तुम्ही रात्रीचा स्वयंपाक व जेवण केलेली भांडी रात्रभर तशीच खरकटे ठेवून सकाळी उठून घासत असाल तर ही सवय बदलून टाका. असे केल्याने घरामध्ये धनाची देवी “लक्ष्मी’ थांबत नाही.
3. जर तुम्ही तुटलेल्या कंगव्याने केस विंचरत असाल तर हा धन प्राप्तीमध्ये अपशकून मानला जातो.
4. जर तुम्हाला नख चावण्याची किंवा कुरतडण्याची सवय असेल तर ही सवयसुद्धा धन प्राप्तीसाठी योग्य गोष्ट नाही. या सवयीमुळे तुमचे शरीर अपवित्र होते आणि यामुळे देवी लक्ष्मी रुष्ट होते.
5. रात्री हात-पाय न धुता झोपत असाल किंवा ओले पाय तसेच ठेऊन झोपण्याची सवय असेल तर हा धन प्राप्तीसाठी शुभ शकुन नाही.
6. ज्या घरांमध्ये पूजा किंव आरतीचा दिवा फुंकर मारून विझवला जातो, त्या घरात देवी लक्ष्मी थांबत नाही. यामुळे दिवा कधीही स्वतः विझवू नये.
7. ज्या घरांमध्ये नियमित शंखध्वनी होत नाही आणि देवी-देवतांबद्दल अपशब्द काढले जातात अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीही निवास करत नाही.
8. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, ज्या घरामध्ये पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केले जात नाही, तेथे लक्ष्मी वास्तव्य करत नाही.
9. पूजा घर मानसिक शांती, सकारात्मकता आणि घरातील लोकांच्या प्रगतीसाठी पूजा घर नेहमी घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला असायला हवे . कारण ते देवांचे स्थान असते. तसेच, पूजा घराच्या वर आणि खाली शिडी, शौचालय किंवा स्वयंपाकघर असू नये हे लक्षात ठेवा.
वास्तु दोष दूर करण्यासाठी बासरी हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, असे मानले जाते. आर्थिक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी व्यक्तीने घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला चादीची बासरी ठेवावी. सोन्याची किंवा चांदीची बासरी घरी ठेवणे शक्य नसेल तर बांबूची बासरी सुद्धा ठेवू शकता.
गणेशाची मूर्ती किंवा फोटो
श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. धन आणि सुखातील अडथळे दूर करण्यासाठी गणपतीची मूर्ती घरात ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार मूर्ती ईशान्य दिशेला ठेवावी, जेणेकरून प्रत्येकाला गणपती बाप्पाची (Ganpati Bappa) मूर्ती पाहायला मिळेल.
लक्ष्मी आणि कुबेर देवताची मूर्ती
माता लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती घरात ठेवने शुभ मानले जाते. माता लक्ष्मी आणि कुबेर संपत्तिचे देवता मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती ठेवल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
शंख
वास्तुशास्त्रानुसार घरात शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो. शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये देवी लक्ष्मीच्या हातात सुशोभित शंख असतो, त्या घरांमध्ये (Home) देवी लक्ष्मीचा वास असतो. अशा घरांमध्ये आर्थिक समस्या राहत नाही.