(संगमेश्वर / विवेक शेट्ये)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर नजीक धामणी येथे झालेल्या कंटेनर आणि डंपरच्या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. महंमद अजमुद्दिन अन्सारी हा अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला आहे. तर सोलु सखाराम गौतम आणि महम्मद याकूब हे किरकोळ जखमी झालेले आहेत.
सोनू सखाराम गौतम हा आपल्या ताब्यातील कंटेनर MH04 HS 1067 घेऊन मुंबईहून गोव्याकडे जात होता तसेच म्हात्रे कंपनीचे डंपर MH46 BF 0959 हा चालक महंमद अन्सारी हा धामणी कडे खडी घेऊन जात असताना मुबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी अपघात झाला असून खडी भरलेला डंपर रस्त्याच्या बाजूला खोल दरीत कोसळला.
या अपघातातील किरकोळ जखमीना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून अधिक उपचार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजीत मोरे करीत आहेत.
अपघाताची माहिती कळताच संगमेश्वर पोलीसानी घटना स्थळी धाव घेत महामार्गावर खोळंबली वाहतूक वर्दळ सुरळीत केली. यात चंद्रकांत कांबळे, सतिश कोलगे, विनय मनवल, सिद्धेश आंब्रे, रोहीत पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपघातस्थळाचा पंचनामा केला.