(खेड / इक्बाल जमादार)
खेड मधील धामणंद येथे श्री महालिंग अभिषेक उत्सव समिती, पंधरागांव पालांडे हितवर्धक मंडळ-मुंबई (नियो.), ९६ कुळी पालांडे प्रतिष्ठान आणि अखिल पालांडे परिवाराच्या सयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १८/१२/२०२३ रोजी सहावा वार्षिक लघुरुद्र अभिषेक सोहळा सकाळी ७.३० ते सांयकाळी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यामध्ये श्री गणेश पुजन, शंखनाद, घंटानाद होमहवन, लघुरुद्र अभिषेक, किर्तन आणि महाआरती आणि पालांडे परिवारातील विशेष कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी सर्व भक्तांना अन्न महाप्रसाद सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती अभिषेक उत्सव समितीचे प्रमुख श्री गजाननराव पालांडे व श्री यशवंतराव (आप्पा) पालांडे यांनी दिली आहे.
अभिषेक उत्सव समिती, पंधरागांव पालांडे हितवर्धक मंडळ-मुबई आणि ९६ कुळी पालांडे प्रतिष्ठान यांच्या वतीने वेगवेगळ्या राज्यातील व जिल्हयातील पालांडे परिवारातील सर्व कुटुंबिय आणि सर्व मित्रमंडळी व आप्तेष्ट यांना अशी विनंती करण्यात येत आहे की, सर्वांनी सदर, लघुरुद्रअभिषेक सोहळ्याचा आणि अन्न महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.