(मुंबई)
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या प्रकृतीच्या कारणाने चर्चेत आहेत. तब्येत बिघडल्याने उपचारांसाठी ते अमेरिकेला गेल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत होते. पण आता धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी चाहत्यांना धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.
हेमा मालिनी म्हणाल्या, धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. रुटीन हेल्थ चेकअप करण्यासाठी ते अमेरिकेला गेले आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही. सनी देओलची बहीण अमेरिकेत रहात असल्याने ते तिथे गेले आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याने चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे .
धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी सनी देओल त्यांना अमेरिकेला घेऊन गेला आहे. तसेच पुढील २० दिवस तो त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे समोर आले होते. तसेच त्यांचे वय ८७ वर्षे असून अनेकदा त्यांच्या तब्येतील चढ-उतार होत आहेत. पण चिंता व्यक्त करण्यासारखे काहीही नाही. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करू लागले आहेत.