(रत्नागिरी)
शहरातील धनजीनाका बेलबाग येथे बेकायदेशीरपणे गावठी दारुची विक्री करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार १६ जुलै रोजी सायंकाळी ४.५५ वा.करण्यात आली.
या प्रकरणी आकाश सुनील गिते या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी शहर पोलिस धनजीनाका परिसरात गस्त घालत असताना त्यांना संशयित हा गावठी हातभट्टीची ५०२ रुपयांची ९ लिटर दारुविक्रीसाठी आपल्याकडे बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.