दिल्ली नजीकअसलेल्या फरीदाबादमध्ये एक हादरवणारी घटना समोर आली आहेत. रात्री रडून झोपमोड करत असल्याने रागाच्या भरात एका व्यक्तीने आपल्या दीड वर्षीय चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, दीड वर्षीच्या मुलाचा त्याच्या पित्यानेच रागाने जीव घेतला. शेजाऱ्यांनी याबाबत सांगितले की, रात्री अचानक मुलाच्या रडण्याचा आवाज बंद झाला. तेथे आम्ही जाऊन पाहिल्यानंतर दिसले की, मुलाच्या नाकातून व तोंडातून रक्त येत होते. मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी वडिलांविरुद्ध आपल्याच मुलाच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दीड वर्षीय मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला गेला. आरोपीचे नाव सुंदर असल्याचे सांगण्यात आले. सुंदर एका कंपनीत कामाला आहे. त्याचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता.