(राजापूर / तुषार पाचलकर)
गेली 33 पेक्षा जास्त वर्ष कार्यरत असलेली राजापूर तालुक्यातील पाचल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था ही पाचल परिसरात गेल्या दोन वर्षांपासून सहकार क्षेत्रात वेगाने झेप घेत आहे. मग ते नवीन झालेले सभासद असो, नवीन ठेवीदार असो, वा नवीन खातेदार असो किंवा अनेक वर्ष रखडलेले कर्जदार असो, सर्व काही सुरळीत वाटचाल सुरू असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था चेअरमन राजानंद तांबे यांनी यावेळी दिली.
दि.२५ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक श्री सोपान शिंदे यांनी पाचल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्था कार्यालयास सदिच्छा भेट देऊन पतसंस्था संचालक यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा बँक संचालक आंबा टिळेकर यांनी मार्गदर्शन करुन यासंस्थेची आर्थिक स्थिती सन 21/ 22 च्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करताना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मधुकर टिळेकर यांनी संस्थेची तपासणी सन 2022 /23 च्या आर्थिक पत्रकांवर अध्यक्ष व संचालक यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केले व कार्यरत असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांचे कौतुक केले. अशाच प्रकारे कारभार करून संस्थेचा जोमाचा कारभार करण्यात यावा असा सल्लाही यावेळी त्यांनी उपास्थितांना दिला व उपस्थित अध्यक्ष, उपाध्यक्ष यासह संचालक मंडळाचे यांचे आभार मानले.
यावेळी सहाय्यक निबंध अविनाश इंगळे, सहाय्यक सहकार अधिकारी राजापूर, राहुल खडसे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मधुकर टिळेकर,पाचल माजी उपसरपंच किशोर नारकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे अध्यक्ष राजनंद तांबे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संचालिका योगिता जाधव, अंतर्गत हिशोब तपासणीस रमेश चाफळे, सहसचिव श्रुती ताम्हणकर, वसुली अधिकारी सिताराम जाधव, माजी संचालक अनंत जाधव, पाचल बौद्ध विकास मंडळ मुंबई चे उपाध्यक्ष अशोक तांबे, येरडव सोसायटी चे किसन जाधव, सदस्य शिवाजी जाधव, सह पाचल ग्रामविकास अधिकारी A K कांबळे, मंडळ अधिकारी सभासद संजय पवार, पतसंस्था वसुली अधिकारी तुषार पाचलकर आदी मान्यवर उपस्थित होते.