(अकोला)
अकोल्यातील डॉ .पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ काल पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी बोलत होते. यावेळी, कृषी विद्यापीठाकडून त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे हे उपस्थित होते.
सध्या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असून महागाईनेही उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढीमुळे त्याचा इत्तर गोष्टींवर परिणाम जीवनावश्यक गोष्टीही महाग झाल्या आहेत. तर या महागाईने व देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाचे विधान केले आहे. सध्या , दोन रुपयांनी जरी इंधनाचे दर कमी झाले तरी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा दिलासा वाटतो. एकीकडे इंधन दरवाढीवरुन सरकारसह नागरिकही त्रस्त असताना, नितीन गडकरींनी पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर आता फक्त गहू, तांदूळ, मका लावून कोणी भविष्य किंवा आर्थिक स्थिती बदलू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता नाही, ऊर्जा दाता बनण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटीची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर असणार आहेत. विदर्भातील कापूस बांग्लादेशात निर्यात करण्याची योजना बनविली असून, याकरिता विद्यापीठांचा सहयोग आवश्यक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णत: थांबविण्यासाठी विद्यापीठ मोठे सहकार्य करू शकते असेही त्यांनी पुढे सांगितले.