सोमवारी आलेल्या विनाशकारी भूकंपात तुर्की आणि सीरिया उद्ध्वस्त झाले आहेत. या भूकंपाची विदारक दृश्ये समोर आली आहेत. भूकंपाच्या धक्क्याने सीरियातील घरे, इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. अनेकजण ढिगा-याखाली अडकले आहेत. मात्र इतक्या मोठ्या नैसर्गिक संकटातही एका नवजात बाळाचा जीव वाचला आहे. देव तारी त्याला कोण मारी… या म्हणीचा प्रत्यय येथे आला आहे. ढिगा-याखालून चिमुकलीला वाचवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, दुर्दैवाने त्या चिमुकल्याचे आई आणि वडील यांचा मृत्यू झाला आहे.
तुर्कीमध्ये मदत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या भूकंपाची विदारक दृश्ये समोर आली आहेत. अशातच उत्तर सीरियात एका घराच्या ढिगा-यातून नवजात अर्भकाला जिवंत बाहेर काढण्यात आले. ढिगा-याखालून बाळाला वाचवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बचावपथकातील जवान मलब्याखालून बाळाला वाचवत असल्याचे दिसत आहे. ढिगा-याखालून एका गर्भवती महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याचवेळी त्या बाळाचा जन्म झाला.