(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच नेहरू युवाकेंद्र रत्नागिरी आणि जिल्हा वाहतूक शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रितेश भायजे याने केले. दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व संबंधितांना या निमित्ताने योगदान देण्याची संधी देण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ आयोजित केला जातो हे प्रास्ताविकामध्ये सांगण्यात आले. नारायण रोडे यांनी ट्रॅफिक नियमांबद्दल मार्गदर्शन केले. सुशील कदम यांनी महा ट्रॅफिक ॲप तसेच अपघाताची कारणे व अपघात रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी बद्दल माहिती सांगितली.
या कार्यक्रमाला रत्नागिरीतील जिल्हा वाहतूक शाखा रत्नागिरी येथील पी.एस.आय चव्हाण , एन.वाय.व्ही वैभव सावंत महेश लोटणकर (नेहरू युवाकेंद्र) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील , उपप्राचार्या वसुंधरा जाधव व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सौ ऋतुजा भोवड आणि इतर प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला सनगरे हिने केले तर दर्शन शिंदे याने आभार मानले.