(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव,घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात दिनांक २७ जुलै २०२२ रोजी आयक्यूएसी विभागांतर्गत समारंभ समिती व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष प्रवेशित नवगतांचा ‘स्वागतोत्सव’ साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाच्या कारकिर्दीतील हा पहिला सोहळा ठरला. या कार्यक्रमाला संस्था कार्यवाह सुनील वणजू, प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला विभागप्रमुख ऋतुजा भोवड, वाणिज्य विभागप्रमुख निलोफर बन्नीकोप, विज्ञान विभागप्रमुख वैभव घाणेकर, समारंभ समिती प्रमुख अनन्या धुंदूर,सांस्कृतिक विभाग प्रमुख वैभव कीर व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रास्ताविकातून मयुरेश आग्रे या विद्यार्थ्यांने या दिनाचे महत्व व गरज सांगितली त्यानंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात शब्दसुमनांनी व पेढे वाटप करून सर्वांनी स्वागत केले. नूतन विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. त्याचबरोबर आपले छंद,आवड याविषयी मनोगत व्यक्त केले.
उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव , प्रा.विनय कलमकर, प्रा.आसावरी मयेकर यांच्या सौजन्याने ईंट्राॲक्टिव्हचा वापर करून महाविद्यालयातील काही माजी यशस्वी विद्यार्थ्यांची माहितीपर चित्रफीत दाखवण्यात आली.
महाविद्यालयात चालणारे विविध उपक्रम, स्पर्धा,सृजनोत्सव,आता पर्यंतची शैक्षणिक वाटचाल याबद्दलची चित्रफीत देखील विद्यार्थ्यांना दाखवली गेली. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनार्थ द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकपात्री अभिनय, नृत्य, गीत गायन यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व त्यांच्यासाठी फनी गेम्सचेही आयोजन केले होते. शेवटी अल्पोपहार देण्यात आला.कार्यक्रम अतिशय आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशराज चाळके, श्रावणी राऊत या विद्यार्थ्यांनी केले तसेच अस्मिता गांगरकर हिने आभार मानले.