(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव,घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे संस्था कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर यांच्या हस्ते दत्तक गावामध्ये उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या दोन उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे.नेतृत्व , संघभावना आणि ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी हा यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे, असे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून सांगितले.
उद्घाटन प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली गावच्या सरपंच सौ. सलोनी जोशी, सदस्या शर्वरी भाट्ये, माजी सरपंच शंकर झोरे, उमरे गावप्रमुख सुभाष फणसोपकर, पोलीस पाटील दिनेश कांबळे, राजू केळकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड, सहाय्यक प्रकल्पाधिकारी विनय कलमकर तसेच विभागातील सर्व सदस्य आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनय कलमकर यांनी केले प्रा. मिथिला वाडेकर यांनी आभार मानले