(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात 2021-22 च्या कला, वाणिज्य विज्ञान तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘शुभेच्छा समारंभ ‘पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आठल्ये-सप्रे-पित्रे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर यांची होती याशिवाय भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्यवाह सुनील वणजू हे देखील उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व विद्यार्थ्यांप्रती सदिच्छा व्यक्त केल्या. उपप्राचार्या सौ वसुंधरा जाधव यांनी लिखित संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
कला शाखा प्रमुख प्रा.ऋतुजा भोवड, विज्ञान शाखा प्रमुख प्रा.वैभव घाणेकर, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा.निलोफर बन्निकोप यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून भावी कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. तिन्ही शाखेच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी महाविद्यालयातील शैक्षणिक सोयी-सुविधा,प्राध्यापकांचे सहकार्य व अध्यापन पद्धती याविषयी आपली मनोगते व्यक्त केली. डॉ.तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पुढील भविष्यात सुजाण नागरीक होण्यासाठी, कार्यक्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न ,मेहनत, जिद्द, अधिकाधिक ज्ञानग्रहण याची आवश्यकता याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनन्या धुंदूर यांनी केले तर प्रा.विनय कलमकर यांनी आभार मानले