(संगमेश्वर)
युवा तालुका प्रमुख श्री.प्रसाद अपंडकर, महिला आघाडी तालुका संघटक रेश्मा परशेट्ये, युवा संघटक श्री.यश कोळवणकर, शाखा प्रमुख श्री.सचिन कानसरे, युवा शाखा प्रमुख श्री. समिर आंब्रे, श्री. राकेश सागवेकर यांचे विशेष प्रयत्नाने संगमेश्वर तालक्यातील देवळे येथे स्ट्रीट लाईट बसवणे कामाचे भूमिपूजन आज शुक्रवार दि.२०/१०२०२३ रोजी श्री.गुरव यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
श्री उदयजी सामंत (रत्नागिरी पालकमंत्री) यांनी मंजुरी दिलेल्या देवळे येथे वरची वाडी (शिर्के वाडी) स्ट्रीट लाईट बसवण्याच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले.या कामा साठी ३१९८६५/- निधी उपलब्ध झाला. ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत. यावेळी दिलीप शिर्के, बंड्या कानसरे, रधूनाथ पांचाळ, अनीलजी शिर्के, दीपक बागवे, सचिन कानसरे, बाळादादा गुरव, शिंदे गुरुजी, बाबू बागवे, चेतन शिंदे,समिर शिर्के, बंडू शिंदे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.