(देवरूख/सुरेश सप्रे)
देवरूख विविध सेवा सहकारी सोसायटीतर्फे दुध संकलन होत होते. परंतू शासकीय यंत्रणेकडून दुध संकलन होत नसलेने शेतकरी वर्गाला दुधाचे काय करावे हा प्रश्न पडला होता. त्यावर सोसायटीचे वतीने देवरूख दत्तमंदिर येथे देवरूखातील शेतकरीवर्गाची दुध संकलनावर तोडगा काढणेसाठी बैठक घेणेच आली. त्या बैठकीत शासकिय दरापेक्षा जास्त दर व इतर सोईसुविधा देत असलेल्या वारणानगर येथील गोकूळ दुध संघाला दुध द्यावे व तो गोकूळ संघ जो दर देईल त्यातील फक्त १ रू विकास सोसायटी आपल्याकडे ठेवून बाकी सर्व पैसे शेतकरी वर्गाला दिले जातील असे ठरविणे आले होते. तसेच संघाने दुध ताब्यात घेतले वर त्यात घट वा खराब झाले या सबबी सांगता नयेत असे ठरले होते. तसेच या संकलनापुर्वी संघाचे जबाबदार पदाधिकारी व शेतकरी यांची एकत्र बैठक घ्यावी जेणेकरून शेतकरी वर्गाला दर व इतर असलेल्या शंकांचे समोरासमोर निरसन होत समाधान झालेवर संकलन सुरू करावे असे ठरले व यावर सोसायटी संचालक व शेतकरी यांचे एकमत होत दुध वारणा संघाला द्यावे असे ठरले.
त्यानंतर सोसायटी संचालक मंडळाच्या आग्रही भुमिकेवर विश्वास ठेवत दुध संकलनास संघाचे दर पत्रक येवून १ सप्टेंबरपासून संकलनास सुरूवात झाली. अस असतानाही सोसायटीच्यावतीने आज पर्यंत गोकूळ संघाचे दरपत्रक दुध धारकांना दिलेले वा दाखविलेले नाही. तसेच त्यांचे अधिकारी व दुधधारक यांचेशी संवादही साधला नाही. यावरूनच माजी चेअरमन भाई बोरूकर यांनी संताप व्यक्त करीत सोसायटीकडे लेखी तक्रार देत याचा संचालक मंडळाने खुलासा करून शेतकरीवर्गाची हित जापासावे असे म्हटले आहे. यावर त्यांनी सोसायटी कार्यालयात चौकशी केली असता दर ३२.५० पैसे लिटर आला असून आम्ही १.५०पैसे ठेवले. तर सुमारे ५० ते ६० लिटर कमी भरले आहे असे सांगितले गेले असा दावा बोरूकर यांनी केला. यावरून आता जनरल सभेत जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
देवरूख सोसायटी शेतकरीवर्गाला जादा लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नालाच हरताळ फासत असल्याचा ओरोप भाई बोरूकर यांनी केल्यामुळे गोकूळ संघाकडून होणारे दुध संकलनाबाबत सेवा सोसायटीची भुमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे दिसत आहे.