(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूख शहरातील मराठी शाळा नं. १ जवळच नदीवरील वरची आळीकडे जाणे येणे साठीचा मुख्य रहदारी असलेला जुना छोटा पुल एका बाजून खचला असलेने त्यावरून रहदारी करणे धोकादायक झाले असल्याने तो तातडीने दुरूस्त करणेत यावा अशी मागणी त्यावार्डातील नगरसेवक वैभव पवार यांनी न. प. च्या मासिक सभेत केली. देवरूख वरची आळी, भायजे वाडी, कुभांर वाडी, मोरे वाडी, शिंदे वाडी, गेल्या वाडी, वाडेश्वर स्मशान भुमी व हरपुडे याकडे जाणे येणेसाठी पुर्वी शिवकालीन दगडी पुल होता. त्या दगडी पुलावरून वाहन रहदारी करणे अवघड होत असलेने त्या पुलाच्या लागूनच १९७६ चे सुमारास छोटेखानी पुल बांधणे आला. त्यामुळे वाहनांची व रहदारीचा समस्या दुर झाली
वार्ड ४ मधील मराठी नं१ शाळेच्या जवळच असलेला हा छोटा पुल १९७६ सुमारास बांधणे आला होता. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी वर्गाची व वाहनांची वाहतूक व्यवस्था सक्षम झाली होती. असा हा मुख्य रहदारी वर्दळ असलेला पूलाचा एक भाग खचत असून त्या मोठे भगदाड पडले असून पाणी साठा असलेने ते भगदाड मोठे होत आहे. त्यामुळे तो तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या दुरूस्तीसाठी अंदाजे १५ लाख रू. खर्च अपेक्षित आहे.
या दुरूस्ती साठी महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान जिल्हा विकास निधीतून वा अन्य निधीतून तातडीने दुरूस्ती करून शाळकरी मुले व जनतेच्या रहदारीला होणारा संभाव्य धोका टाळणेसाठी नगर पंचायतीने तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी नगरसेवक पवार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे दिली. तसेच या विषय मासिक सभेत उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. हा धोकादायक पुल तातडीने दुरूस्त न केलेस, तो एकाबाजून पडलेस वाहतूक व्यवस्था पुर्णपणे कोलमडून शाळकरी मुले व वाहन धारकांसह जनतेची फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. आता शहरातील गटार व्यवस्थेला प्राधान्य देण्यारे नगर पंचायत प्रशासन त्वरीत काय उपाय योजना करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.