(देवरूख)
देवरूख शिवाजी चौक येथून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या बाबतीत फिर्याद सुरेश कृष्णा मोघे यांनी दिली. मोघे यांची पांढऱ्या रंगाची 35 हजार रूपये किंमतीची ज्युपिटर गाडी (क्र. एमए 08, एयु- 5741) मोघे कॉम्प्लेक्स येथून अज्ञाताने शुक्रवारी रात्री 8 वाजता चोरून नेली. ही बाब मोघे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञातावर देवरूख पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.