( देवरूख / सुरेश सप्रे )
देवरूख नगर पंचायतीचा स्वच्छता अभियान स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकावून ठसा उमटवलेने देवरूखचे नाव सर्वदुर पोहचले आहे. यामुळे नप प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे सर्वत्र कोतूक होत आहे.
नुकताच मुंबई येथे पार पडलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते देवरुख नगरपंचायतीला स्वच्छता अभियानात राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त करत सन्मानपत्र आणि दहा कोटीचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. त्यामुळेच २०१६ सालच्या क्षणाची देवरुखवासियांना आठवण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देवरुख नगरपंचायतीला सन्मानपत्र आणि एक कोटी चे बक्षीस देऊन गौरवण्यात आले होते.
तत्कालीन नगराध्यक्ष निलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजीत शेटये व मुख्याधिकारी सौ शिल्पा नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. नगराध्यक्ष निलेश भुरवणे आणि उपनगराध्यक्ष अभिजीत शेटये या त्यावेळच्या जोडगोळीने उभारलेल्या स्वच्छता मोहीमेवर कळस चढवण्याचे काम विद्यमान नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कदम नगरसेवक आणि मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी जनतेच्या सहकार्यातूनच केलेले कामामुळे १० कोटी व सन्मानपत्र बक्षिस मिळवून देवरूखची शान वाढविली आहे.
नगर पंचायतीच्या यशाचा हा चढता आलेख शहरवासियांच्या योगदानामुळेच वाढत राहावा, असा आशावाद नगराध्यक्षा सौ.मृणाल शेट्ये यांनी व्यक्त केला.