(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील देवरूख तुळसणी दरम्यान कार आणि दुचाकीमध्ये गुरुवारी (दिनांक १० ऑगस्ट २०२३) सकाळीं साडेनऊच्या भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
एका फायनान्स कंपनीचे दोन ऑफिसर दुचाकीवरून ( दु. क्रमांक MH 08 AZ 2060 रत्नागिरी ते देवरूख असा प्रवास करत होते. तुळसणी दरम्यान दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या कार (गाडी क्रमांक MH 08 AX 4073) चालकाने कृष्णा लक्ष्मण जाधव ( वय 54, राहणार राजापुर) याने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला दिलेली धडक इतकी जोराची होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले. एका ऑफिसरचा पाय गुडघ्यातून पूर्ण फिरून मोडला आहे. दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघेही गंभीर स्थितीत असल्याने दोघांनाही वाहनचालकांच्या मदतीने तत्काळ रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋतिक रवींद्र पवार ( वय ३० राहणार सोमेश्वर, रत्नागिरी) व कल्पेश विलास कांबळे ( वय २८ राहणार – निवसर, रत्नागिरी ) अशी अपघातातील गंभीर जखमींची नावे आहेत.
सध्या गंभीर जखमी झालेल्या दोघांवर ही रत्नागिरी येथील एका खासगी रुग्णालयात अती दक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. दोघे ही अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याने अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलविण्याची माहिती मिळाली आहे. देवरुख पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगितले गेले. मात्र कार चालकावर अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.