( देवरूख /सुरेश सप्रे )
देवरूख शहरातील दत्तनगर या गजबजलेल्या वस्तीतील एसव्ही प्लाझा अपार्टमेंट मधील काल रात्री चोरट्यांनी २बंद प्लँट फोडून सोने चांदीसह रोख रक्कम असा सुमारे ६०हजाराचा ऐवज लंपास करून चोरट्यांनी पोबारा केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या चोरीचा छडा लावणेचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
याबाबत पोलिसस्थानकातून मिळालेल्या माहीतीनुसार देवरूख बसस्थानक ते महाडिक स्टाँप या गजबजलेल्या रस्त्यात लगतच्या एसव्ही प्लाझा या ४मजली इमारतीतील A विंग मधील पहील्या मजल्यावरील बाहेरगावी गेल्याने बंद असलेल्या दोन प्लँटमधील दरवाजे फोडून आत प्रवेश करीत कपाटे फोडून सोने चांदीच्या वस्तूसह रोख रक्कमवर डल्ला मारूम चोरट्यांनी पोबारा केला. आज सकाळी शेजारी राहणाऱ्या दरवाजे उघडे दिसलेने त्यांनी चव्हाण व ब्रीद यांना सांगितले. त्यानंतर ही बाब उघड झाली. त्यातच बाजूच्या प्लँटला बाहेरून कडी घातलेली आढळून आली.
चव्हाण याचा प्लँट मधील कपाट उचकटून सोने चांदीच्यावस्तूसह रोख रक्कम असा सुमारे २१ हजाराचा तर शेट्टी यांची कपाटे फोडून रोख ४० हजार रक्कम चोरट्यांनी लांबविली व पलायन केले
घर मालक आलेवर पंचनामा करून रत्नागिरीतून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. भरवस्तीत घरफोडीने पोलिसांची झोप उडाली आहे. काही महिन्यापुर्वी कांजिवरा भागातील नुरखान यांचे घरावर पिस्तूल दाखवत पडलेल्या दरोड्याचे धागेदोरे अजूनही मिळालेले नसल्याने या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करून चोरांना जेरबंद करण्याचे आव्हान देवरूख पोलिसांसमोर आहे. अधिक तपास पो. नि. बळीराम जाधव यांचे मार्गदर्शनखाली हेड काँन्टेबल दिपक पवार करीत आहेत