(संगमेश्वर)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यावतीने १४, १७, १९ वर्ष वयोगटातील मुले व मुली यांच्या राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धां दि.२९ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत संपन्न झाल्या.
कोल्हापूर विभागीय संघात रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्रीय शिक्षण संस्था पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल, साडवलीच्या द्रोण मोहन हजारे विद्यार्थ्यांने १४ वर्षे (मुले) गटात राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे प्रशालेच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे. द्रोण हजारे याची राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्रशाले तर्फे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोहर गुरव यांनी द्रोण हजारे तसेच स्पर्धेतील सर्व विजेत्या सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.