(देवरुख/सुरेश सप्रे)
संगमेश्तावर तालुक्यातील सर्वांत मोठी असलेल्या देवरुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत महा विकास आघाडीचा एक हाती झेंडा फडकला असला तरी अध्यक्ष पदाच्या निवडीवरून आघाडीत बेबनाव सुरू असल्याच्या वस्तुनिष्ठ बातमीने शहरात व महाविकास आघाडीत खळबळ उडालेने आज आघाडीच्या सर्व नेत्यांनी तातडीने बैठक घेत तोडगा काढत आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेतलेने सर्व संचालकांनी निश्वास टाकलेचे चित्र दिसत आहे.
या बाबत हाती आलेल्या माहितीनुसार आज दुपारी ३ वाजता सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत नुतन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार आहे. त्या आधी आघाडीत बेबनाव नसल्याचा निर्वाळा देत सोसायटीत अडीच-अडीच वर्षाचा फाँर्मुला राबविणेचे ठरले. त्यानुसार पहीले अध्यक्ष पद अडीच वर्षे सेनेकडे व पुढील अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे यावर एकमत झालेवर अध्यक्ष पदासाठी जुन्या जाणते व सर्वांना बरोबर घेत काम केलेल्या संतोष लाड यांची निवड निश्चित केलेने आघाडीत बिघाडी नाही हे दाखविले गेले आहे. उपाध्यपदी वाशीचे उपसरपंच सुनिल सावंत यांची वर्णी लागल्याने जुने व नवे व शहरी- ग्रामीण वादावरही पडदा पडला.
वास्तविक निवडणुकीत आघाडीने एकत्र समन्वय साधत सर्वांना बरोबर घेत एकतर्फी विजय मिळविला होता. परंतू अध्यक्ष पदाची निवडणुक जाहीर झालेवर सर्व नवनिर्वाचित संचालकांची एकत्र बैठकीचे आयोजन करून सर्व संमतीने उमेदवार ठरविणे गरजेच होते. ते न करता काहींनी स्वतंत्रपणे सुत्र हलविणे सुरूवात केल्याने संचालकांमधे नाराजीचा सुरू उमटलेने सोशल मिडीया व वृत्तपत्रांचे बातमी प्रसिद्ध झालेवर आघाडीतील वरीष्ठांनी लक्ष घालत आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेतल्याने आघाडीतील बेबनाव नसल्याचे दाखविले.
अध्यक्षपदावरून वाद निर्माण होणेची दाट शक्यता लक्षात घेत निवडणुक बिनविरोध होणेसाठी आघाडीतील वरिष्ठ नेतृत्वाने त्वरीत लक्ष दिल्यानेच आघाडीत फुट वा बेबनाव नाही हे दाखवत आगामी जिप निवडणुकीतही याचा परीणाम होणार याची हि दक्षता घेतल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला !
अध्यक्ष पदासाठी जुने जाणते व सर्वांना बरोबर घेवून जाणारे संतोष लाड हे ७ वर्षांनी पुन्हा या पदावर विराजमान होणार आहेत. तर उपाध्यक्षपदी प्रथमच संचालक झालेले सुनिल सावंत यांची नावे घोषित केली. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध करून आघाडी भक्कम असल्याचे सध्या चित्र आहे.