(देवरुख / वार्ताहर)
देवरुख लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी ला. चेतन पाडळकर यांची निवड करण्यात आली आहे. १६ रोजी सर्व पदाधिकारी यांचा शपथविधी होणार आहे. लायन्स क्लबच्या सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. यात सर्वानुमते चेतन पाडळकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी उल्हास नलावडे, खजिनदार पदी अभिषेक अग्रवाल तर सचिव म्हणून अमित सावंत यांची निवड झाली आहे.
या सर्व पदाधिकाऱ्यांचा १६ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील हॉटेल पार्वती पॅलेस या ठिकाणी शपथविधी होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळामुळे लायन्स क्लब केवळ सामाजिक काम करीत होते. त्या दोन वर्षांमध्ये ला. नितीन शेडगे यांच्याकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
कोरोनाचा काळ ओसरल्यामुळे पुन्हा एकदा लायन्स क्लबने सामाजिक काम जोमाने पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. याच उमेदीतून या तरुण पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे माजी प्रांतपाल ला. उदय लोध व एम जे एफ ला. संजय पटेल व सर्व लायन्स सदस्यांनी अभिनंदन केले आहे.