(देवरुख/प्रतिनिधी)
देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पांगरी रोडवर काल शुक्रवार 1 जुलै रोजी सकाळच्या सुमारास दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
देवरूख पांगरी रोडवर दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. काल शुक्रवारीही सकाळी 7.30 वाजता दरड कोसळली. सुदैवाने या मार्गावरून वाहतूक कमी होती. दरड रस्त्यावर कोसळल्यानंतर मोठं मोठे दगड रस्त्याच्या मधोमध आलेले होते. मात्र वाहन चालकांनी स्वतः गाड्या थांबवून ते दगड बाजूला केले आणि एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर या विषयी बांधकाम विभागाला माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्यात आली