(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख न्यू इंग्लीश स्कूलचे कलाशिक्षक दिंगबर मांडवकर यांच्या चिञाची राज्य प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ६३ वे महाराष्र्ट राज्य कला प्रदर्शन २६ व २७ डिसेंबर रोजी मुंबई येथे भरणार आहे. यासाठी राज्यभरातून चिञे मागवली होती. एक हजार चिञांमधून शंभर चिञे या प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहेत. त्यातील एक चिञ हे दिंगबर मांडवकर यांचे आहे ही बाब तालुकावासियांसाठी भूषणावह आहे.
कोकण किनारपट्टीवरील सागरी सकाळ व तेथील लोकजीवन मांडवकर यांनी कॅनव्हाॅसवर उतरवले आहे.अचुक रंगसंगती साधण्यात मांडवकर माहिर आहेत.नुकतेच त्यांचे एक चिञाचा काठमांडू येथील आंतरराष्र्टीय प्रदर्शनात सहभाग होता.
मांडवकर हे मुंबई विद्यापीठ राष्र्टीय स्तर सुवर्णपदक विजेते आहेत.अनुपम लिमिटेडचे ते ब्रँड अँबॅसिडर आहेत.देश-विदेशात त्यांच्या चिञांची प्रदर्शने झाली आहेत. जिंदाल २०२३ पुरस्कार व अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी कलाप्रांतात उत्तम कामगिरी करत आहेत.राज्यप्रदर्शनासाठी चिञाची निवड झाल्याने मांडवकर यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
चिञाची निवड झाली याबाबत बोलताना दिंगबर मांडवकर यांनी कलाकार म्हणुन मला अभिमान वाटला हे जरी खरे असले तरी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ व विशेष करुन संस्थाध्यक्ष व एक चांगला माणुस म्हणुन मी सदानंद भागवत यांचे विशेष आभार मानतो असे स्पष्ट केले. सदानंद भागवत नेहमीच मला प्रोत्साहन देत असतात, नवनवीन विषय देवून माझ्याकडून ते चिञ तयार करुन घेत असतात. हे माझ्यासारख्या साध्या कलाकाराला फार मोठी गोष्ट आहे हे मांडवकर यांनी नमूद केले.