(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरुख शहरवासीयांची गरज असलेला अग्निशामक बंब आज देवरुख नगरपंचायत मधे दाखला झाला.५ एप्रिल रोजी तत्कालीन नगराध्यक्षा सौ मृणाल शेटये व मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी कोल्हापूर येथील कंपनीला अग्निशामन गाडी बनवून देण्याबाबतची वर्क ऑर्डर सुपूर्द केली होती. आज सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अग्निशामक बंब नगरपंचायत मध्ये दाखल झाला आहे.
देवरुख शहरवासीयांती अनेक वर्षांची मागणी लक्षात घेऊन तात्कालिन नगराध्यक्षा सौ मृणाल शेटये आणि सर्व सहकारी नगरसेवकांनी अग्निशामक बंब मिळवा यासाठी प्रयत्न केले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि संगमेश्वर चिपळूण विधानसभेचे आम. शेखर निकम यांचं यासाठी मोठे सहकार्य लाभले होते. आज खऱ्या अर्थाने मोठी गरज पूर्ण होत आहे. अग्निशामन बंब चालविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी भरण्यासंदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय स्तरावरुन सुरू झाली असून नगरपालिका प्रशासन विभाग, मुंबई यांच्याकडून मान्यता मिळताच जिल्हाधिकारी स्तरावर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची भरती होईल. प्रशिक्षित कर्मचारी भरती होईपर्यंत नगरपंचायतीकडे उपलब्ध कर्मचाऱ्यांनाच सदरचा अग्निशामन बंब चालवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित कर्मचारी भरण्यासाठी मान्यता मिळावी याकरिता देखील प्रशासनाकडे मंत्रालय स्तरावर प्रशासनाला पाठपुरावा करावा लागणार आहे.