(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख एस.टी.आगाराच्या सोयी सुविंधासाठी उद्योगमंञी उदय सामंत यांनी ७ कोटीचा निधी मंजुर केल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.
देवरुख आगाराच्या सोयीसुविंधासाठी आपलं देवरुख ..सुंदर देवरुख या लोकचळवळीने लक्ष घातले आहे.समस्यांचे निवेदन आमदार शेखर निकम व उद्योगमंञी उदय सामंत यांना देण्यात आले होते.आमदार निकम यांनी यासाठी पुढाकार घेवून उद्योगमंञी उदय सामंत यांची भेट घेवून ही मागणी लवकर मंजुर करण्याची विनंती केली होती.मंञी उदय सामंत यांनी देवरुख एस.टी.आगारासाठी ७ कोटीचा निधी मंजुर केला आहे.देवरुखवासीयांनी मंञी सामंत व आमदार निकम यांना धन्यवाद दिले आहेत.
आपलं देवरुख-सुंदर देवरुख या लोकचळवळीमुळे देवरुखमधील विविध समस्या मार्गी लागत आहेत हे विशेष. देवरुख आगारात वाहन पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह, चालक-वाहक यांची चांगली निवास व्यवस्था होणे गरजेचे आहे.
देवरुख एसटी आगाराची नवीन इमारत होवून अनेक वर्ष झाली तरी त्याचे अधिकृत उद्घाटन झालेले नाही. सध्या आॅफिस व वर्कशाॅप आहे ही इमारत १९६५ सालातील आहे. ती आता जीर्ण झाली आहे. वर्कशाॅपसाठी जागा कमी पडत आहे. गाड्यांची वाढती संख्या पाहता सर्व्हिसचे दोनच रॅंप पुरेसे नाहीत.यासाठी जुनी इमारत पाडुन नवीन इमारत उभी राहणे गरजेचे आहे. यासाठी उद्योगमंञी उदय सामंत व आमदार शेखर निकम यांनी पाहणी करुन इमारतीसाठी निधी मंजुर करावा अशी मागणी होत आहे. या इमारतीला तडे गेले आहेत, पावसाचे पाणी गळत आहे. वाहननिरीक्षक कक्षही नवीन बांधायला लागणार आहे. या भागात रस्ताही चांंगला होणे आवश्यक आहे.