(संगमेश्वर)
लहान मुलांना खेळण्या-बागडण्याची सवय व्हावी, प्रतापसूर्य बाजीराव पेशव्यांचा इतिहास माहिती व्हावा, लहान मुले मोबाईल, टीव्हीपासून दूर व्हावीत यासाठी उद्यानाची उभारणी स्वखचनि करत आहोत, असे मदन मोडक यांनी सांगितले.
चोरपऱ्या येथे देवरूख नगरपंचायतीच्या मदतीने या उद्यानाची उभारणी होत आहे. या वेळी आमदार शेखर निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन विसपुते, सदानंद भागवत, मृणाल शेट्ये, रूपेश कदम उपस्थित होते.
प्रभाग क्र. ७ चे माजी नगरसेवक सुशांत मुळ्ये यांनी या उद्यानासाठी तीन वर्षे पाठपुरावा केला. आता हे उद्यान परिपूर्ण होणार आहे. सदानंद भागवत यांनी बोलताना, देवरूख शहरात मुळातच देव थांबलेले आहेत. त्यामुळे या शहराला दातृत्ववान माणसे मिळालेली आहेत. मदन मोडक यांनी हे उद्यान उभारले आहे. अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत. प्रतापसूर्य बाजीराव पेशवे यांचा इतिहास सर्वांना माहिती होण्यासाठी या उद्यानात पेशवे इतिहासाची म्युरल्स बसवावीत यासाठी मी आर्थिक मदतीची व्यवस्था करेन.
आमदार शेखर निकम यांनी मदन मोडक यांच्यासारखी देवमाणसे देवरूखला लाभली आहेत. यातूनच अशा उद्यानांची निर्मिती होत आहे.कांजिवरा येथेही उद्यान होणार आहे. देवरूख शहर हे खास उद्यानासाठी ओळखले जाईल, असा आशावाद निकम यांनी व्यक्त केला.