तौक्ते चक्रीवादळाने संगमेश्वर तालुक्यातील बामणोली आणि हरपुडे गावात झालेल्या नुकसानीची जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी काल पाहणी केली. खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा करण्यात आला.
या दोन गावात वादळामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पाहणी दरम्यान माजी सरपंच सचिन मांगले यांनी गरजूंना तातडीने पत्र्यांची मदत केली.
यावेळी माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या समवेत माजी सभापती बंड्या बोरुकर, सरपंच शिंदे मॅडम, माजी सरपंच किसन राणे, माजी सरपंच सचिन मांगले, प्रदीप गुरव, दर्शन भाटकर, विनित बेर्डे, उपस्थित होते. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी रोहन बने, बंड्या बोरुकर, सचिन मांगले यांचे आभार मानले.