( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / देशमुख यांचे पथकाने संगमेश्वर तालुक्यात धडक कारवाई करत ८ आरोपींसह १.९५,३८० /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक १७/०७/२०२२ रोजी, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी देवरुख शहरातील कदम चाळ येथे चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. यामध्ये आरोपी विजय गणपत कदम यांच्या मालकीच्या खोलीमध्ये जुगाराचा अड्डा चालु असल्याची माहिती मिळाल्यावरून सपोनि / देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकुन तीन पानाचा जुगार खेळणारे (१) विजय गणपत कदम (घरमालक) (२) संदिप अनंत देसाई (३) मंगेश शिवराम पर्शराम (४) अब्दुल सत्तार दाऊद लांबे (५) महेंद्र मनोहर लिंगायत (६) आत्माराम शंकर देवळेकर (७) मिकशेठ हरिश्चंद्र पाथरे (८) सुधीर बाबसो कांबळे यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदयान्वये कारवाई केली. सदरील कारवाईमध्ये रोख रक्कम व इतर साहित्यासह एकुण रु. १,९५.३८०/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यावरून देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०७/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे दि. १८/०७/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुढे ही अशीच कारवाई केली जाईल
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / देशमुख यांचे पथकाने केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या, अशा शेजारील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडुन अवैद्य धंदयावर घाडी टाकण्याच्या पदस्तीने, अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे देखील अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.