शिवसेना प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना अनिल परब ह्यांनी घेलेल्या दूरचित्रप्रणाली द्वारे बैठकीत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांची नुकसान भरपाई देण्याची केली मागणी…..
संपूर्ण कोकणाला तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून त्यासंदर्भात शिवसेना प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना अनिलजी परब ह्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांसमवेत दूरचित्रप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
शिवसेना प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना अनिलजी परब ह्यांनी घेतलेल्या दूरचित्रप्रणालीद्वारे बैठकीत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात झालेल्या तौत्के चक्रीवादळा मुळे नुकसानीची माहिती देऊन सदरचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करून मिळणारी नुकसानभरपाई निसर्ग चक्रीवादळाच्या निकषानुसार मिळावी अशी मागणी केली. त्याप्रसंगी राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे उपस्थित होत्या.