(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जाधव फिटनेस अॅकॅडमीमार्फत 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. सर्व समाजातील विधवा महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आपल्या आजूबाजूला अशा कष्टकरी महिला असल्यास त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे, आपण समाजाचे काही देणे लागतो या भुमिकेतून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे जाधव फिटनेस सेंटर तर्फे सांगण्यात आले आहे. तरी कृपया अशा महिला आपल्या आजूबाजूला असल्यास हेमंत जाधव – 9422052504 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्या मराठा श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन
1जानेवारी 2023 रोजी जाधव फिटनेस अँकेडमीच्या 2ऱ्या वर्धापनदिन निमित्ताने 2 शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केल्या आहेत. एक भव्य मराठा श्री शरीर सौष्ठव स्पर्धा 2023असेल. ही स्पर्धा सर्व समाजातील लोकांसाठी खुली असेल तर दुसरी मराठा श्री मर्यादित शरीर सौष्ठव स्पर्धा फक्त मराठा समाजासाठी असेल. या स्पर्धेला मराठा असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे. दोन्ही स्पर्धा जिल्हास्तरावरील असतील.
मराठा श्री ओपन स्पर्धा 4 गटात घेतली जाईल. तर मराठा श्री मर्यादित हि स्पर्धा 2 गटामध्ये घेतली जाईल. त्या दोन्ही स्पर्धांची बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत.
प्रथम क्र. –1500/व शिल्ड, दुसरा क्र.–1000/ व शिल्ड तिसरा क्र.–750/व शिल्ड, चौथा क्र.–500/व शिल्ड, पाचवा क्र.–300/व शिल्ड.
दोन्ही टायटल विजेत्याला 2500 व आकर्षक शिल्ड, मानाचा बेल्ट. तर नंबरात बसणा॒-यांना अँकेडमीतफेँ प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धा सां.6 वा चालू होतील. स्पर्धा रत्नागिरी असोशीएशन व अँकेडमीच्या नियमात होतील. पंचाचे निर्णय अंतिम असतील. स्पर्धेत गैरवर्तन आढळून आल्यास त्या स्पर्धकाला व त्या जीमला कायम स्वरुपी बाद केले जाईल, यांची संबंधितांनी नोंद घ्यावी.
या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंत्री नामदार उदय सामंत यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी माजी खासदार निलेश राणे, आमदार राजन साळवी, प्रसिद्ध उद्योजक भैया उर्फ किरण सामंत, अकॅडमी चे अध्यक्ष रोशन फाळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आपणही या कार्यक्रम स्थळी – जाधव फिटनेस सेंटर, गाडीतळ, परटवणे रोड, वरचा फगरवठार रत्नागिरी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक हेमंत शांताराम जाधव व व शांताराम शिवराम जाधव यांनी केले आहे.