(खेड)
श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल, खेड चे प्राचार्य व दुर्ग अभ्यासक श्री. सिद्धार्थ उर्फ भगवान देसाई यांनी दुर्गभ्रमंतीचे शतक पूर्ण केले आहे. किल्ले कुर्डूगड उर्फ विश्रामगड गड सारखा आव्हानात्मक असणारा गड सर करीत त्यांनी शतक पूर्ण केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक येथील १०० किल्ल्यांवर जाऊन इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम श्रद्धा असलेला प्रा. सिद्धार्थ देसाई यांनी येथील किल्ल्यांवरती जाऊन तेथील माती आपल्या कपाळी लावून घेतली आणि महाराष्ट्रामध्ये असलेले ३७५ किल्ल्यावरती जाऊन तेथील माती कपाळी लावण्याचा निश्चय केलेला आहे. प्रा. श्री. सिद्धार्थ उर्फ भगवान देसाई यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर, मनविसे मा.जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, प्राचार्य साठे,जयेश गुहागरकर आदी मान्यवर उपस्थित होते.