( रत्नागिरी / प्रतिनिधी )
खेडशी चांदसूर्या येथे उभी करून ठेवलेली दुचाकी चोरी गेल्याचा प्रकार 14 एप्रिल 2022 रोजी घडला होता. सकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत हेमंत मांडवकर (45, पानवल, घवाळीवाडी) यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
ग्रामीण पोलिसांनी हेमंत मांडवकर यांच्या तक्रारीनुसार चोरट्या विरोधात भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला होता. तपासामध्ये पोलिसांनी पवनकुमार उदय सिंग (24, हरियाणा) याला दुचाकी चोरल्या प्रकरणी अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर दोषारोप पत्र ठेवण्यात आले. खटल्या दरम्यान 5 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाकडून अँड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दुचाकी प्रकरणात पवनकुमार याला दोषी मानून 4 महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी संगीता वनकोरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. या खटल्यात मदतनीस म्हणून पोलिस हवालदार दुर्वास सावंत यांनी व पैरवी अधिकारी म्हणून हवालदार संजीवनी मोरे व सुनील आयरे यांनी काम पाहिले.