(चिपळूण)
भरधाव वेगात दुचाकीस्वाराने समोरुन आलेल्या एस.टी. बसला धडक दिल्याची घटना कामथे येथे घडली होती. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले होते. याप्रकरणी राजेश अशोक गोंधळेकर (46, डेरवण) या दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सुकन्या विनोद आंबेरकर यांनी दिली आहे. या अपघातात राजेश गोंधळेकर व महेश खातू (45, सावर्डे) असे दोघे जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खबर देणारे एस.टी. चालक महेश मानवेल मिरपगार 2 जुलै रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास प्रवासी घेऊन रत्नागिरीहून दापोली जात होते. रात्री 8.45 च्या सुमारास कामथे साईकृपा धाब्यासमोर राजेश गोंधळेकर याने दुचाकी भरधाव वेगात चालवून बसला समोरुन धडक दिली. दोन्ही वाहनाच्या नुकसानीस व स्वतःच्या आणि इतराच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.