(खेड)
खेड पोलीसांनी दारूबंदी कायदा अन्वये छापे घालून “देशी-विदेशी मद्य साठा” जप्त केला आहे
दिनांक 12/03/2023 रोजी, गोपनीय बातमीच्या आधारे सपोनि. सुजीत गडदे, प्रभारी अधिकारी, खेड पोलीस ठाणे व पथकामार्फत केळणे गवळवाडी-आंबडस येथे देशी-विदेशी मद्य साठा करणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये छापे टाकण्यात आले.
या छाप्यांमध्ये, केळणे गवळवाडी-आंबडस येथील एका दुकानाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या खोलीत, एकूण १,२५० विविध देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या असणारा एकूण ₹१,२२,५००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी अमित सदानंद करंजकर वय ३९ वर्षे, रा. आंबडस यांस, हा साठा आपल्या ताब्यात गैर कायदा व बिगर परवाना तसेच शासनाचे कोणतेही शुल्क न भरता नागरिकांना वाढीव भावाने विक्री करत असताना मिळून आल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं_६३/२०२३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), १८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सपोनि. सुजीत गडदे, प्रभारी अधिकारी, खेड पोलीस ठाणे व पथकाने दिनांक 12/03/2023 रोजी आंबडस, खेड मधीलच खोतवाडी येथील दुसऱ्या छाप्यामध्ये, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या संतोष ज्ञानेश्वर मोरे वय ४८ वर्षे रा. आंबडस यांस ₹२,२३०/- किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले तसेच खेड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सपोनि श्री. सुजित गडदे, प्रभारी अधिकारी, पोकॉ/1291 श्री. अजय कडू, पोकॉ/1315 श्री. रुपेश जोगी, खेड पोलीस ठाणे, पोकॉ/823 श्री. राहुल कोरे, खेड पोलीस ठाणे, व चालक पोहवा/213 श्री. दिनेश कोटकर, खेड पोलीस ठाणे यांनी एकत्रित ही कामगिरी पार पाडली.