(संगमेश्वर)
एज्युकेशन सोसायटी कडवई संचलीत “दि कडवई, इंग्लिश स्कूल” ने तालुकास्तरीय तायक्वादो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. दि कडवई इंग्लिश स्कूल ग्रामीण भागातील अत्याधुनिक शिक्षण देणारे स्कूल असून, या यशाने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांनी केले.
या स्पर्धेत युसुफ खान, तनाज मुल्लाजी, अब्रार लालू, आमीर चौधरी, निहाल खान, अंजर खान यांनी गोल्ड मेडल पटकावले. तसेच तहा अतिव, अयान खान यांनी सिलव्हर पदके पटकावली तर शाश्वत मोहिते, महोम्मद अर्ष डोंगरकर, मोहतसिम नायकोडी यांनी कास्य पदक पटकवून शाळेला द्वितीय क्रमांक मिळवून दिला. या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक अविनाश जाधव यांनी प्रचंड मेहनत घेतली.
स्पर्धेसाठी मार्गदर्शक संकेता जाधव यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. त्याच बरोबर सहशिक्षक विशाल धनावडे यांनी ही विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या घवघवित यशाबद्दल अध्यक्ष सादीक काझी, उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे, अफसर खान, रिझवान कारीगर, सिकंदर जुवळे यानी मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.