(रत्नागिरी)
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग क्रिकेट खेळाडूंकरिता आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खेड येथील क्रीडा संकुल मैदानात एक दिवशीय लेदर बॉल क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा करीता खेड, दापोली, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी या तालुक्यातील दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
शिबिरासाठी उपस्थितीत खेळाडूंन मधून दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी या जिल्हा संघासाठी संघ निवड करण्यात आली. संघाच्या कर्णधार पदी अष्टपैलू खेळाडू मंदार खैर, उप कर्णधार एकनाथ जोशी, खेळाडू अल्पेश तावडे, सागर आईनकर, अजय घाणेकर, अंकुश पेवेकर, सुफियांन तांबे, दिपक फुटक, सागर जाधव, अजिंक्य तांबे, राहुल बरे, दिनेश रेवाळे, ऋषिकेश महाडिक संघ व्यवस्थापक ओंकार साळवी, प्रशिक्षक रोहित तांबे, अक्षय मोरे यांची यांची निवड करण्यात आली.
निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी जनार्दन पवार, राजेश धारीया, मंगेश चांदणे, हर्षद चव्हाण, पांडुरंग नाचरे, राज सावंत, तुषार पाबे यांनी विशेष सहकार्य केले. निवड चाचणी शिबिरात सहभाग झालेल्या खेळाडूंना दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे पदाधिकारी, कौस्तुभ बुटाला, मंगेश कडवंईकर, रेणुका गोरीवले, पल्लवी सावंत, प्रज्ञा जंगम, संतोष मालशे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.