(खेड)
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने अनुग्रह स्पेशल स्कुल वेरळ खेड या मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्य यांचे वाटप व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी पांडुरंग नाचरे ,हर्षद चव्हाण, राजेश धारीया, गंगाराम आखाडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वर्ग व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्ती शरीराने दिव्यांग असले तरी मनाने खुप खंबीर असतात. दिव्यांग व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. त्यांना मदत करतांना उपकाराचा आव आणू नये. कर्तव्य व सेवा भावनेतून त्याच्याकडे समाजाच्या प्रत्येक घटकातील प्रतिनिधींनी बघावे असे मत प्रशांत सावंत यांनी व्यक्त केले.