(रत्नागिरी)
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी (क्रीडा,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक) या संस्थेच्या वतीने दिनांक २२ व २३ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील दिव्यांग कबड्डी खेळाडू यांच्या प्रोत्साहनासाठी कोकणातील व रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या भव्यदिव्य अशा दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन खेड येथे करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या अस्थिव्यंग दिव्यांग कबड्डी खेळाडूंना या कबड्डी स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी या संदर्भात अधिक माहिती करीता दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री.प्रशांत सावंत यांच्याजवळ ८३८०८३७५०० या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.