( खेड / इक्बाल जमादार )
खेड गुरुवर्य श्री.ग.रा चिकणे गुरुजी प्रतिष्ठान खेड व दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्यारा कबड्डी असोसिएशन तालुका कबड्डी असोसिएशन व पंचमंडळ यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय दिव्यांग पुरुष कबड्डी स्पर्धा 2023 ही स्पर्धा किशोरजी कानडे क्रीडांगण, तीन पत्ती नाका, खेड येथील क्रीडांगणामध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन प्रसंगी दापोली मंडणगड मतदार संघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम यांनी गौरवोद्गार काढले.
कोकण रत्न पुरस्कार खेळाडू विजेते सुनिल भगवान शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आयोजक म्हणून अध्यक्ष, एडवोकेट संदेश वंदना गणपत चिकणे व उपाध्यक्ष श्री पप्पू चिकणे गुरुजी प्रतिष्ठान व त्यांचे सर्व सदस्य तसेच दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कृष्णा चिकणे विश्वस्त गुरुवर्य प्रतिष्ठान यांनी केले. या संबंधी नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, अकोला, रायगड, रत्नागिरी अ व रत्नागिरी ब असे संघ सहभागी झाले आहेत. ही कोकणातील पहिली दिव्यांग कबडी स्पर्धा आहे.